तुळजापूर /प्रतिनिधी-
कोरोना पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेला श्री तुळजाभवानी तुळजाभवानी मंदिराचा पाठीमागील बाजुस असणारा छत्रपती शिवाजी महाराज दरवाजा सोमवारी पुजारीवृंदानसाठी सुरु करण्यात आलाअसुन लवकरच भाविकांनसाठी ही खुला केला जाणार आहे.छञपती शिवाजी महाराज दरवाजा उघडला गेल्याने आरादवाडी भागातील वास्तव्य करणाऱ्या पुजारी वृंदांची सोय झाली आहे.
आरादवाडी भागातील रहिवाशांनी हा दरवाजा सुरू करण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटीलनगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार हा दरवाजा सुरू करण्यात आला. यावेळी अामदार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, युवा नेते विनोद गंगणे, श्री.अविनाश गंगणे,श्रीनाथ शिंदे,औदुंबर कदम विशाल रोचकरी आदी पुजारी बांधव व मंदीर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.