उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 उस्मानाबाद जिल्ह्यातील क्षयरुग्णावर उपचार  करणाऱ्या   खाजगी रुग्णालय, केमिस्ट आणि  लॅब या सारख्या संस्थाना क्षय रुग्णांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

 आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारच्या अधिसुचनेनुसार प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद होऊन त्याला उपचार करणे व क्षयरोगाचा  प्रसार रोखणे नियमत उपचारास प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपायोजना करणे हा उदे्श आहे त्यामुळे आशा रुग्णाची नोंदणी करणे अनिवार्य आहे .  खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय संस्थानी क्षयरोग निदान करणाऱ्या राज्यातील सर्व पॅथॅलॉजी मायक्रो बायोलॉजी,  प्रयोशाळा रिव्हर्स रेडिओलॉजी, सुविधा  क्षयरुग्णावर उपचार काणारे विविध पॅथॉलॉजी सर्व रुग्णालये डॉक्टर्स सर्व बाहय रुग्ण व आंतररुग्ण सविधाआणि क्षयरोगाची औषधे विकणारे सर्व औषधे विक्रिते यांनी  राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.

  त्या प्रयोशाळा डॉक्टर/ रुग्णालये/ औषध विक्रिते रुग्णांची नोंदणी करणार नाहीत. अशा संस्था/ व्यक्ती क्षयरोगाचा प्रसार करण्यासाठी जबाबदार धरण्यात येऊन भारतीय दंड विधान कलम 269,270 नुसार करवाईसाठी पात्र आहेत. या कलमाअंर्गत दोषी ठरलेल्या व्यक्तीस किमान सहा महिने ते दोन वर्षापर्यंत शिक्षा व दंडाची तरतूद आहे. उस्मानाबाद जिल्हयातील क्षयरोग निदान करणाऱ्या सर्व प्रयोशाळा, क्षय  रुग्णावर उपचार करणारी

 विविध पॅथीची सर्व रुग्णालये/ डॉक्टर्स, क्षयरोगाची औषघे विकणारे सर्व औषध विक्रिते यांना दिनांक 1 जानेवारी 2021 पासून आपल्याकडे  होणाऱ्या/उपचार घेणाऱ्या/ औषधे घेणाऱ्या सर्व रुग्णांची नोंदणी जिल्हा क्षयरोग उस्मानाबाद कार्यालयास करण्याविषयी कळविण्यात येत आहे. क्षय रुग्ण नोंदणीसाठीच्या विहित नुमन्यातील माहिती जिल्हा क्षयरोग कार्यालय उस्मानाबाद यांच्याकडे प्रत्यक्ष किंवा dtomhobd@rntcp.org या ई मेलवर दरमहा पाठविण्यात यावी.

 दोन आठवडयाहून अधिक कालावधीचा खोकला दोन आठवडयाहून अधिक कालावधीचा ताप, वजनात लक्षणीय घट, भूक न लागणे, मनेवर गाठ येणे या पैकी कोणतेही एक लसण असल्यास संशयित क्षय रुग्ण समजण्यात यावा, असे जिल्हा क्षयरोग केंद्राचे जिल्हा क्षय रोग अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

 
Top