उस्मानाबाद/ प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृर्षी स्वावलंबन योजनेस   दि.05 फेब्रुवारी 2021 रोजी  राज्य शासनांने  प्रशासकीय मान्यता प्रदान दिल्यामुळे योजना राबविण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. कोरोना रोगाच्या प्रदुर्भावामुळे या योजनेच्या अंमलबजावणीस शासनाकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती , अशी माहिती जिल्हा परिषदचे कृर्षी विकास अधिकारी डॉ.टी .जी चिमनशेट्ये यांनी आज येथे दिली .                         

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृर्षी स्वावलंबन योजना २०१७ पासून राबविण्यात येते. या योजनेत आजपर्यंत 350 हून अधिक शेतकऱ्यांनी अर्थिक लाभार्थीसाठी निवड करुन नवीन सिचंन विहिर , जुन्या विहिरची दुरुस्ती   शेतळ्यालसाठी अस्तरीकरण प यापैकी एका पॅलाभ देण्यात आलेला आहे. चालू वर्षी यायोजने अंतर्गत पाच कोटी रुपायांच्या निधीस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यामधून अंदाजे 150,ते 200 लाभार्थ्यांच्या निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर नवीन सिंचन विहिरीसाठी 535 अर्ज प्राप्त झालेले आहेत. यायोजनेस मान्यता मिळाल्यामुळे राज्य स्तरावरुन ऑनलाईन पध्दतीने लाभर्थीची निवड लॉटरीदारे लवकरच करण्यात येणार असे डॉ चिमनशेटे यांनी कळविले आहे.

 अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी लागू असलेूल्या व सारखेच घटक असलेल्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेस यापुर्विस शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. या लाभार्थी महाडीबीटी पोर्टलवाअर्ज करण्यासाठी 11 जानेवारी 2021 ही अंतिम मुदत देण्यात आली होती या योजनेस एकूण 31 ऑनलाईन अर्ज प्राप्त झलेले आहेत. लवकरच लाभार्थी निवड प्रक्रिया ऑनलाईन लॉटरीपध्दतीने करण्यात येणार आहे. निवड होणाऱ्या लाभर्थीनी योजनामधील उपलब्ध सर्व घटकाचा लाभ घ्यावा असे आवहन मा.दत्ता ( आण्णा साळुंके)  कृषी विषय समितीचे सभापती व अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी तथा निवड समितीचे अध्यक्ष् अनिलकुमार नवाळे यांनी केले आहे.


 
Top