उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 जिल्ह्यामध्ये शेतकरी कुटुंबातील मुलींना शैक्षणिक येणाऱ्या अडचणींमुळे शिक्षण सोडावे लागते, अल्पवयीन वयात लग्नासाठी उभे राहावे लागते आणि यापायी होणार्या शेतकरी आत्महत्या हा बिकट प्रश्न उभा राहतो या घटना रोखण्यासाठी  आपणाला शिक्षण घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधावे लागतील. शिवार फाऊंडेशनच्या माध्यमातून मागील ६ वर्षांपासून हाच प्रयत्न सुरू आहे. शिवार हेल्पलाइन द्वारे अशा शेतकऱ्यांसाठी उपाययोजना राबविण्यात आहोत. 

लीना पूनावाला फाउंडेशनच्यावतीने (एलपिएफ) आर्थिकदृष्ट्या वंचित मुलींच्या नि:शुल्क शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन फाउंडेशनकडून करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील कोणत्याही महाविद्यालयात २०२०- २०२१ मध्ये प्रथम शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या मुली यासाठी अर्ज करू शकतात. गेल्या २५ वर्षापासून फाउंडेशनने ९३०० पेक्षा जास्त मुलींना शिष्यवृत्ती दिली आहे.

 शिष्यवृत्तीचे तपशील

 बी.ई. किंवा बी.टेक., बारावी, डिप्लोमा, बीएससीमध्ये नर्सिंग आणि बी. फार्मसी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध आहे.  पात्रतेचे निकष आणि अर्जासाठी www.lpfscholarship.com किंवा www.lilapoonawallafoundation.com या संकेतस्थळावर भेट द्या.

 अर्जाची अंतिम तारीख :

अभियांत्रिकी (बी.ई.)/ बी.टेक. : २ फेब्रुवारी,इंजिनिअरिंग  डिप्लोमानंतर : ७ फेब्रुवारी, बी. फार्मसी आणि बीएससी नर्सिंग : 14 फेब्रुवारी अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास तात्काळ शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ संपर्क साधावा, असे आवाहन शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांच्याकडून करण्यात आले आहे. हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे.

  यासाठी  मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह मुंबई, तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद, कृषी महाविद्यालय गडपाटी उस्मानाबाद , जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या  शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी  अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.


 
Top