उस्मानाबाद (प्रतिनिधी) 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उस्मानाबाद पंचायत समिती मध्ये साजरी करण्यात आली.

पंचायत समितीच्या सभापती श्रीमती हेमा महेश चांदणे, उपसभापती आशिष नायकल, महेश चांदणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी एम.आर.माने, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मिलिंद कांबळे,शाखा अभियंता एन.एस.पाटील, सभापती यांचे स्वीय सहाय्यक संतोष वाघमारे, कृषी अधिकारी दराडे,राऊत, राजेश स्वामी यांच्यासह पदाधिकारी आणि पंचायत समितीमधील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 

 
Top