उस्मानाबाद / प्रतिनिधी-

देशातील संस्थानीक, राजे, वतनदार, सरदारांनी आपले आयुष्य मौज-मजा व विलासी घालविले. त्यामुळे अखंडप्राय असलेल्या या देशावर ईरान, अफगाणिस्तान मार्गे डच, इंग्रज, मुस्लिम राष्ट्रांचे  आक्रमण झाले. देशाचे तुकडे पाडण्यास सुरुवात झाली होती. रयतेवर अन्याय सुरू झाला होता. अशा परिस्थितीमध्ये मॉ जिजाऊंच्या संस्कारामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी १६ व्यां वर्षीच तोरणा किल्ला जिंकून देशावरील आक्रमण थोपविण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन मुख्यकार्यकारी अधिकारी भगीरथ जोशी यांनी केले. 

छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती रुपामाता अर्बन/मल्टीस्टेट को ऑ.क्रे.सो.लि.उस्मानाबाद  येथे साजरी करण्यात आली .यावेळी रुपामाता समुहाचे चेअरमन अॅड.व्यंकटराव गुंड, संचालक , समता पंतसस्थेचे कार्यकारी संचालक संदिप  कोयटे, समता इन्टरनेश्नल स्कुलचे कार्यकारी संचालक सौं.स्वाती कोयटे, राजाभाऊ वैद्य,अजित व्यंकटराव गुंड उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना भगीरथ जोशी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांची फौज जमा करून हेरगिरीसाठी मावळे निवडले.या मावळ्यांच्या जोरावरच महाराजांनी गनिमी काव्याने स्वराज्य निर्माण केले. 

या कार्यक्रमास सत्यनारायण बोधले, मिलींद खांडेकर, विधी अधिकारी सौ.विद्युलता दलभंजन,खोत सागर, सोमेश्वर शिंदे,तडवळकर, तिवारी,कासार,भोसले,शाहुराज गवाड,महेश जाधव,जाधव,गगणे,अश्विनी मदनुरकर ,सौ.मृणमई पाटील,सौ.मधुरा कुलकर्णी,स्वामी, घुटे,मंडगे,आकोसकर, इंगळे,गायकवाड, भोरे,नामदेव सुर्यवंशी तसेच सर्व कर्मचारी वर्ग , सभासद व ठेवीदार आदी उपस्थित होते .


 
Top