उस्मानाबाद (प्रतिनिधी) 

छत्रपती शिवरायांचा आदर्श जगासमोर प्रेरणादायी असल्याचे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी व्यक्त केले.छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती उस्मानाबाद जिल्हा परिषदेत साजरी करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहांमध्ये अध्यक्षा अस्मिता कांबळे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

रयतेचा राजा,शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि थाटात साजरी केली जाते. मात्र गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गजन्य साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून प्रतिबंधक उपाय योजना केल्या जात असल्याने सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत. त्यांचा आदर्श संपूर्ण जगासमोर प्रेरणादायी असल्याचे मत अध्यक्षा कांबळे यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, शिक्षणाधिकारी (माध्य.) गजानन सुसर,सामान्य प्रशासन विभागाचे कनिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी बी.आर.हजारे, वरिष्ठ सहाय्यक एफ.एस.पटेल,वरिष्ठ सहाय्यक(भांडार विभाग) मधुकर कांबळे,कनिष्ठ प्रशासन अधिकारी डी.एस.देशपांडे, विस्तार अधिकारी सचिन देवगिरे यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी जयंती कार्यक्रमास उपस्थित होते.


 
Top