परंडा / प्रतिनिधी : - 

तालुक्यातील चिंचपूर (बु) येथील प्रतिष्ठेच्या व संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असेलेल्या, ग्रामपंचायतवर 70वर्षाच्या इतिहासात प्रथमच भाजपा ची सत्ता आली आहे. आ.सुजितसिंह ठाकूर,आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाने व भाजपा तालुका अध्यक्ष राजकुमार पाटील,भाजयुमो तालुका अध्यक्ष अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सत्ता भाजपाने 7- 4 च्या फरकाने खेचून आणली.

 सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण पुरुष पडलेले असताना देखील गावाने महीला सबलीकरणाचा विचार सत्यात उतरवण्याच्या दृष्टीने जनशक्ती परिवर्तन पॅनलच्या प्रमुख परंडा पंचायत समिती सदस्या सौ.अश्विनी सतिश देवकर यांनी ग्रामपंचायतच्या सत्तेच्या चाव्या सावित्रीच्या लेकीच्या हाती देऊन नारी शक्तीचा मोठा सन्मान केला आहे.सर्व सामन्य कुटुंबातील कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या पाच महिला चालवणार आहेत चिंचपूर बु.चा विकासरथ, 

 सरपंच पदी सौ.प्रियंका पोपट शिंदे,तर उपसरपंचपदी सौ.द्वारकाबाई गोवर्धन सावंत यांची वर्णी लागली तर, सौ.शितल दत्तात्रय सुतार, सौ.भाग्यश्री भारत देवकर, सौ.विद्या प्रकाश सावंत,महेश भागवत देवकर, भगवत कोंडीबा शिंदे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते.

कायद्याने महिलांना 50%आरक्षण दिले आहे.पण आज चिंचपूर (बु)ग्रामस्थांनी 100% महिलाराज केले आहे, फुलांच्या पाय-घड्या घालून विजयी महिलांचे पुरुषांकडून स्वागत करण्यात आले.भाजपा चे सर्वसाधारण पुरुष जागेवर निवडुन आलेले महेश देवकर व भागवत शिंदे यांनी पदाची अपेक्षा न करता महिलांच्या हाती सत्ता देऊन खरा पुरुषार्थ दाखवला आहे.त्यांच्या निस्वार्थी वृत्तीच सर्वञ कौतुक होत आहे.  निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी अध्यासी अधिकारी म्हणून संगमनेरकर यांनी काम पाहिले तर ग्रामसेवक लोखंडे, तलाठी नागलोट यांनी सहकार्य केले तर,शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम आंबी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर व पोलीस टीमने पाहिले. यानंतर ग्रामस्थांच्या वतीने उमेदवारांचा नागरी सत्कार करण्यात आला.भाजपा जिल्हाअध्यक्ष नितीन काळे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांनी अभिनंदन केले.

यावेळी भाजपा ता.अध्यक्ष राजकुमापाटील,भाजपा युवानेते संकेत ठाकूर,महावीर तनपुरे, विठ्ठल तिपाले, बंटी ठाकूर, मदन दीक्षित, किरण पांडे, विलास मदने, दत्ता ठाकरे,सुग्रीव कदम, रेवण आरे, हरिभाऊ देवकर, रामभाऊ झांबरे,संजय अनभुले,सुरेश मोरे,सतिश शिंदे, विजय देवकर, सिद्धार्थ सावंत,मारुती सावंत, बाबू दारुळे, सोमनाथ दारूळे, तानाजी कासारे,हनुमंत सुतार,समाधान चव्हाण,राजाभाऊ देवकर, सर्जेराव शिंदे, अर्जुन शिंदे, तुकाराम शिंदे, पांडुरंग शिंदे, सोपान मल्हारे,नितीन सुरवसे,भारत भिलारे, सुभाष झांबरे,प्रमोद देवकर,किरण बोबडे ,ओम शिंदे, साधू कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पत्रकार बांधव उपस्थितीत होते.

 
Top