परंडा / प्रतिनिधी : -

 परंडा तालुक्यातील अनाळा येथील सौ.रेखा सुभाष वाघमारे यांचे दिर्घ आजाराने दि.१३ रोजी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ३८ वर्ष होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा ,पती आहेत. परिट महासंघाचे परंडा तालुका उपाध्यक्ष सुभाष वाघमारे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजपा नेते तथा सरपंच जोतीराम क्षिरसागर, बिबिशन शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. कमी वयात आजाराने ग्रासल्याने त्यांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 
Top