तुळजापूर / प्रतिनिधी

  उपजिल्हा रुग्णालय तुळजापुर येथील आमदार नामनिर्देशित सदस्य म्हणून आनंद कंदले यांची नियुक्ती करण्यात आली आहे, आनंद कंदले यांच्या रुग्ण कल्याण समितिच्या सदस्य पदी नियुक्ति बाबातचे पत्र मा. आमदार श्री राणाजगजितसिंह पाटील यांनी दि. 2 फेब्रुवारी  रोजी तुळजापुर उपजिल्हा रुग्णालयास दिले. त्या नुसार वैद्यकीय अधीक्षक डॉ बोडके सी. एस. यांनी नियुक्ती पत्र आनंद कंदले यांना दिले. 

या रुग्ण कल्याण समितमध्ये  उप विभागीय अधिकारी, सिव्हिल सर्जन (उस्मानाबाद), तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, बि. डी. ओ तुळजापुर, पंचायत समिति सभापती, वैद्यकीय अधीक्षक,सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता, बाल विकास अधिकारी हे सर्व सदस्य आहेत.


 
Top