परंडा / प्रतिनिधी : - 

प्रती वर्षा प्रमाणे रविवार दि.२१ रोजी भाजपा प्रदेश चिटणीस आमदार  सुजितसिंह ठाकुर  यांच्या जन्मदिवसानिमीत्त तालुक्यातील श्री क्षेत्र सोनारी येथे भैरवनाथ चरणी अभिषेक व महापुजा करण्यात आली.तसेच श्री क्षेत्र डोमगाव येथील कल्याणस्वामी मंदिरात महाआरती करण्यात आली व परंडाचे ग्रामदैवत हजरत ख्वाॅंजा बद्रोद्दीन चिश्ती दर्गा येथे चादर चढविण्यात आली व आ. ठाकूर यांना दिर्घआयुष्य व उत्तम आरोग्य लाभो यासाठी प्रार्थना करण्यात आली.

 यावेळी तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, संकेतसिंह ठाकूर, विठ्ठल तिपाले, हनुमंत पाटील, अनिल पाटील, रमेश पवार, विठोबा मदने, मुस्साभाई हन्नुरे, समिर पठाण, जोयब हावरे, प्रमोद लिमकर, संदिप शेळके, उमाकांत गोरे, कांतीलाल पाटील, बाळासाहेब गोडगे, गणेश राशनकर, विलास गायकवाड, रामकृष्ण घोडके तसेच ग्रामीण व शहर भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top