परंडा / प्रतिनिधी : - 

 महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएन सलग्न उस्मानाबाद जिल्हा कबड्डी असोसिएन व परंडा तालुका तालुका कबड्डी संघाच्या वतीने परंडा तालुक्यातील आनाळा येथील न्यु हायस्कुलच्या मैदानावर जिल्हास्तरीय कबड्डी संघाची निवड चाचणी स्पर्धा दि.२१ रोजी पार पडल्या.या निवड चाचणी स्पर्धा चे उद्घाटन अनाळा गावचे सरपंच जोतीराम क्षिरसागर ,कार्ला येथील सरपंच संतोष भुजे व जिल्हा कबड्डी असोसिएननचे सचिव श्री. महादेव साठे व पत्रकार निशीकांत क्षिरसागर यांच्या हस्ते संपन्न झाले. 

 यावेळी उपसरपंच दादा फराटे, प्रगतशील बागायतदार बिबिषण शिंदे, ग्रा.पं. सदस्य कल्याण शिंदे, चांगदेव चव्हाण, रेवनाथ कदम , अशोक शिंदे, प्रकाश शिंदे,कबड्डी संघाचे कार्यध्यक्ष लक्ष्मण मोहीते , गोपाळ येळमकर, मोहन पाटील, अमरनाथ राऊत, डॉ.साजिद चाऊस, नितीन हुंबे, प्रकाश औताडे, प्रा.सुभाष मारकड ,राहुल जाधव,मिठु कदम, मेजर शिवाजी क्षिरसागर, बालाजी शिंदे, रामराजे गेळे, आदी मान्यवर उपस्थित होते. या जिल्हा निवड चाचणी स्पर्धत जिल्हयातील कुमार / कुमारी, किशोर - किशोरी, व पुरुष - महीला अशा एकुण तीस संघानी सहभाग नोंदवला या स्पर्धसाठी स्पर्धा निरिक्षक सम्राट माने, तर पंच म्हणुन राष्ट्रीय पंच सुब्राव कांबळे, रुपेश शेंडगे, अमर सुपेकर, यांनी काम पाहीले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परंडा तालुका कबड्डी असोसिएनचे अजित मुळीक, सचिन पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यानी विशेष परिश्रम घेतले. 

 
Top