उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 भंडारी शिवारातील  एका  हॉटेल मालकावर गोळीबार करणाऱ्या एका आरोपीस कामगारांनी पकडून बेदम चोप दिला होता, त्याच्यावर गेल्या तेरा दिवसापासून उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. हा आरोपी मंगळवारी पोलिसांच्या हातावर तुरी देवून कैदी कक्षातून पसार  झाला आहे. 

 ३  फेब्रुवारी रोजी  दुपारी भंडारी शिवारात हॉटेल रिलॅक्स येथे किरकोळ कारणावरून हॉटेल मालक व या प्रकरणातील आरोपींमध्ये वाद होऊन थेट हॉटेल मालक बाळासाहेब माेरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला.  यातील आरोपी अभिषेक उद्धव विश्वकर्मा यास हॉटेलवरच्या  कामगारांनी पकडून बेदम चोप दिला होता. त्याच्यावर गेल्या तेरा दिवसापासून उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते.  हा आरोपी जिल्हा शासकीय रुग्णालायातील  कैदी कक्षातून मंगळवारी सायंकाळी पसार झाला आहे. 

 
Top