उस्मानाबाद/ प्रतिनिधी

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सहकुटुंब तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. या वेळी नार्वेकर कुटुंबीयांनी तुळजाभवानी मातेची खणा-नारळाने ओटी भरून साडीचोळीची पूजा बांधली. नार्वेकर परिवाराचे पारंपरिक पुजारी राम छत्रे यांनी त्यांची पूजा बांधली. देवी दर्शनानंतर मंदिर कार्यालयात नार्वेकर यांचा तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

या वेळी खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख श्यामल पवार, सुधीर कदम, जगन्नाथ गवळी, सतीश सोमानी, श्याम पवार, लखन परमेश्वर तसेच बाळासाहेब शिंदे, सुनिल जाधव, राजाभाऊ घोडके, प्रतीक रोचकरी, सागर इंगळे, कमलाकर चव्हाण, पिनू भोसले, दिलीप जावळे, तुळशीराम बोबडे, अशोक घोडके , बलीमल शेट्टी आदी उपस्थित होते.


 
Top