तुळजापूर /प्रतिनिधी-
श्रीतुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीत स्थानिक तसेच भाविकांना वेळेवर अल्पदरात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आमदार निधीतुन रुग्ण वाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच आरोग्य सुवधा वेळेवर मिळण्यासाठी हरसंभव प्रयत्न करणार असल्याचे , प्रतिपादन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.
सोमवार दि. ८रोजी आमदार राणाजगजितसिंहजी पाटील यांच्या आमदार निधीमधुन नगर परिषद तुळजापूर यास रुग्नवाहीकेचा लोकार्पण सोहळा. संपन्न झाला.यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार राणादादा,नगराध्यक्ष सचिन रोचकरी,युवा नेते विनोद गंगणे,नगरसेवक पंडीत जगदाळे,विजय कंदले,अविनाश गंगणे,विशाल रोचकरी,माऊली भोसले,अभिजीत कदम,विनोद पलंगे,किशोर साठे,औदुंबर कदम,अंबरीश जाधव,आनंद कंदले,शिवाजी बोधले,गुलचंद व्यवहारे,इंद्रजीत साळुंके,सुहास साळुंके,श्रीनाथ शिंदे,रत्नदिप भोसले,नागेश नाईक,विक्रम देशमुख तथा मुख्याधिकारी लोकरेसाहेब,नगर परिषदचे अधिकारी,कर्मचारी आदी उपस्थितीत होते.