तुळजापूर / प्रतिनिधी

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरुद्ध केलेला कृषी कायदा अन्यायकारक असून, याला आमचा विरोध कायम राहील व हा कायदा सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

तुळजापूर येथील शारदा मंगल कार्यालयात आयोजित स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत शेट्टी बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, संदीप जगताप, आघाडी प्रमुख संजय जाधव, कोषाध्यक्ष बापूसाहेब कारंडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बाळवंतकर, विधी आघाडी प्रमुख विजय जाधव, राज्य कार्यकारिणी सदस्य बिभीषण भैरट, जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतमालाला उत्पादनावर आधारित दर उपलब्ध करून द्यावा. तसेच राज्य सरकारने कोरोना महामारी काळातील लाइट बिल माफ करावे आदी मागण्या केल्या.प्रारंभी प्रतिमा पूजनाने कार्यकारिणीच्या बैठकीत सुरुवात झाली. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी केले.

बैठकीच्या यशस्वितेसाठी जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेदे, ओबीसी जिल्हाध्यक्ष राजेंद्र हाके, जिल्हा कार्याध्यक्ष रवी किरण गरड, तुळजापूर तालुकाध्यक्ष नेताजी जमदाडे, युवक अध्यक्ष दुर्वास भोजने, शहराध्यक्ष प्रदीप जगदाळे, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष दाजी पाटील, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष विष्णू काळे, प्रसिद्धीप्रमुख अनिल धनके, अमोल हिप्परगी, संजय भोसले, शेषराव साळुंके, सर्जेराव सातपुते, सतीश डाके, सीताराम शितोळे आदींनी पुढाकार घेतला. बैठकीला कोल्हापूर, परभणी, लातूर, बीड, औरंगाबाद, सोलापुर, पुणे, जालना आदी जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top