उमरगा / प्रतिनिधी

: जि प.प्रा.शाळा दाबका येथे भाषा प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे .  सहसा बऱ्याच ठिकाणी विज्ञान विषयाची प्रयोगशाळा असते.ती अद्ययावत असते.तेथे विज्ञान विषयाचे शिक्षक विद्यार्थ्यांना विज्ञानातील प्रयोगांचे सादरीकरण करतात.प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून मिळालेले ज्ञान,माहिती दीर्घकाळ स्मरणात राहते.त्यामुळे विज्ञान प्रयोगशाळेच्या धर्तीवर भाषा विषयाची प्रयोगशाळा दाबका जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक श्री वैरागकर एस आर यांच्या संकल्पनेतून  तयार करण्यात आली असून यात विद्यार्थी प्राथमिक विद्यार्थी अक्षरापासून शब्द तयार करणे,शब्दापासून वाक्य तयार करणे,शब्दपट्ट्यामधून समानार्थी,विरूद्धार्थी शब्द शोधने,वचन,लिंग,काळ आदीसंबंधीची माहिती. 

सुवाच्च अक्षरलेखन , शुद्धलेखन आदींची माहिती,साहित्यिकांची माहिती,स्वलिखीत कविता,लहान मुलांसाठीचे पुस्तके,किशोर व इतर मासिके यांचा समावेश करण्यात आला आहे.त्याचबरोबर इंग्रजी तव्यासंदर्भातल साहित्याचाही समावेश करण्यात आले आहे. या नाविण्यपूर्ण अशा  प्रयोगशाळेत विद्यार्थी उत्साने सहभागी होत आहेत.


 
Top