उमरगा / प्रतिनिधी

श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारपासुन (ता.१९) शहरातील शरणाप्पा मलंग विद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या खुल्या व्हॉलिबॉल स्पर्धेत उमरग्याच्या साईराज संघ विजेता ठरला तर देवा संघाला उपविजेता संघाचा मान मिळाला. मंगळवारी (ता. २३) रात्री झालेल्या अंतीम सामन्यानंतर युवा सेनेचे किरण गायकवाड, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला पारितोषक देण्यात आले. 

उमरगा शहरातील महादेव गणेश मंडळ, ब्रह्मदेव गणेश मंडळ, हिंदकेसरी प्रतिष्ठान, शिवशंभो प्रतिष्ठान, महादेव गल्ली व शिंदे गल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने या  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धत लातूर, आळंद (कर्नाटक), सोलापूर व उमरगा येथील २२ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेतील विजेत्या संघाला पंधरा हजार व चषकाचा प्रथम पारितोषकाचा बहुमान उमरग्यातील सन्नी पाटील यांच्या साईराज ग्रुपला  मिळाला. अकरा हजार व चषक उपविजेता ठरलेला उमरग्याच्या देवा ग्रूपला देण्यात आला. बेस्ट सर्विस मॅनचा मान  लातूरच्या फ्रेन्डस संघाचा सलीम शेख (लारा) यांना, बेस्ट शुटरचा मान देवा ग्रुपचा मल्लीकार्जुन यांना तर बेस्ट लिफ्टरचा मान सोलापूरच्या अजिंक्यला देण्यात आला. बेस्ट पंच म्हणुन अमजद बेग यांचा सन्मान करण्यात आला. विजेत्या संघाला व खेळाडूंना किरण गायकवाड,  दिग्विजय शिंदे, सचीन जाधव, योगेश तपसाळे, शरद पवार, अॅड. अमित सांगवे, नगरसेवक महेश माशाळकर, आकाश शिंदे आदींच्या हस्ते पारितोषक देण्यात आले. स्पर्धेत पंच म्हणून राष्ट्रीय खेळाडू रणजित ठाकूर, बाबू लांडगे, श्री. बेग, मुनीर शेख यांनी काम पाहिले. प्रा. सचिन शिंदे यांनी सूत्रसंचलन केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी विनोद कोराळे, अभंग शिंदे, नितीन सुरवसे, शिवशंकर पाटील, अमोल मिरकले, महेश माशाळकर, राजेश शिंदे, अमर शिंदे, दिनेश शिंदे, रतन पाटील, सूरज पाटील, सन्नी पाटील, निखील बिराजदार आदींनी पुढाकार घेतला आहे.


 
Top