उस्मानाबाद/ प्रतिनिधी

उस्मानाबाद येथील जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये दि .९ रोजी कळंब तालुक्यातील एकुरगा येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजाराम भिसे यांची उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सचिव पदी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली . यावेळी परिवहन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष जीवणरावजी गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती .

 पद्मावती जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये कळंब तालुक्यातील एकुरगा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजाराम भिसे यांची जिल्हा राष्ट्रवादीच्या सचिव पदी निवड करण्यात आली . राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी यावेळी त्यांना नियुक्तीपत्र देऊन निवड झाल्याचे जाहीर केले. या निवडी प्रसंगी कळंब उस्मानाबाद जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी तालुकाध्यक्ष श्रीधर भवर ऍड. प्रवीण यादव,पंचायत समिती उपसभापती गुणवंत पवार, कार्याध्यक्ष शिवाजी लकडे ,दिलीप घोलप , हनुमंत पाटोळे, सुरेश टेकाळे, आयाज शेख, मृत्युंजय बनसोडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष भीमा हगारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top