कळंब ( शिवप्रसाद बियाणी )
येथे कळंब पत्रकार संघ, नेत्र दीप व्हिजन केअर व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय च्या राष्ट्रीय सुरक्षा सप्तहानिमित्त वतीने डोळ्यांची मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले
दृष्टी तज्ञ जयराम गुळभिले यांनी वानचालकांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करुन त्यांना डोळ्यांविषयी घ्यावयाची काळजी याबद्दल विशेष मार्गदर्शन केले हे खर्या अर्थाने छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त अभिवादन केलेले आहे, असे मत मोटार वाहन निरीक्षक अतुल चव्हाण यांनी मोफत नेत्र तपासणी प्रसंगी केले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, उस्मानाबाद येथील परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब शहरातील नेत्रदीप व्हिजन केअर क्लिनिक अँड आॅप्टीकल व कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने रा्ट्रीय सुरक्षा सप्ताानिमित्त शहरातील जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या चालकांच्या डोळ्याची मोफत तपासणी सोमवार ता. ८ रोजी आठवडी बाजार रोड वर असलेल्या नेत्रदीप व्हिजन केअर क्लिनिक अँड आॅप्टीकल याठिकाणी करण्यात आली, जवळपास पंचवीस ते तीस चालकांच्या डोळ्यांची तपासणी करून घेतली विशेषतः कलर व्हिजन टेस्ट सुद्धा करण्यात आल्या.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, उस्मानाबाद येथील सहमोटार निरीक्षक कुलदीप पवार, दृष्टी तज्ञ जयराम गुळभिले, पत्रकार संघाचे विश्वस्त तथा नगरसेवक सतीश टोणगे, मंगेश यादव, बालाजी सुरवसे, ओंकार कुलकर्णी, तसेच जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे अध्यक्ष शफीक मोमीन, उपाध्यक्ष अजय सोनवणे, राजेंद्र त्रिवेदी, नाना हंडीबाग, रमेश इखे, बापू जोगदंड, बालू राउत, आप्पा तोडकर आदी चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त १४ फेब्रुवारी पर्यंत मोफत डोळे तपासणी करण्यात येणार असल्याचे दृष्टी तज्ञ जयराम गुळभिले यांनी यावेळी सांगितले.