उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 केंद्रशासन सहाय्यीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत वैयक्तीक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना एकूण प्रकल्प किमतीच्या 35 टक्के व कमाल दहा लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजकांना योजनेंतर्गत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरु झाले आहे, याकरीता अर्जदारांची नोंदणी व अर्ज भरणेकरीता http://pmfme.mofpi.gov.in/ या वेबसाईटचा वापर करावा. अधिक माहितीसाठी येथील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्या फोन – 02472-227118 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी उमेश घाटगे यांनी केले आहे.


 
Top