उस्मानाबाद/ प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील वैष्णोदेवी फुड्स प्रॉडक्ट्स लि. या कंपनीला दूध पुरवठा करणाऱ्या दुधसंस्था, शेतकरी, कर्मचाऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. ही रक्कम मिळण्यासाठी दुध उत्पादकांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अामरण उपोषण सुरू केले हाेते.

जिल्हाधिकाऱ्यांची विनंती, आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी प्रभारी अधिकारी बोरकर यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले. याप्रसंगी अमेय हाडोंग्रीकर पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.


 
Top