उस्मानाबाद/ प्रतिनिधी

महिलांनी त्यागमूर्ती माता रमाई यांचा आदर्श घेऊन आपले जिवन  आदर्शमय केले पाहीजे असे प्रतिपादन जिल्हापरिषद अध्यक्ष अस्मिताताई कांबळे यांनी केले.

तालुक्यातील पेठ सांगवी येथे प्रशिका फाउंडेशनच्या वतिने प्रतिवर्षा प्रमाणे त्यागमुर्ती माता रमाई जन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या व्यक्तींंना मान्यवरांच्या हस्ते विविध  पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास अ‍ॅड. दिलीप निकाळजे, जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे, अ‍ॅड. शितल चव्हाण, न्यायाधीश कुणाल वाघमारे, सरपंच सुभेदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अवंती किरण सगर, साखराबाई सुरवसे, सिंधुबाई बब्रुवान सुरवसे, मिनाबाई सुखसेन सुरवसे, भारतबाई किसन सुरवसे यांच्यासह अन्य महिलांना रमाई पुरस्कारानेे गौरविण्यात आहे. याचबरोबर प्रशासनामध्ये विविध क्षेत्रात काम करणार्‍या जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे, कुणाल वाघमारे आदींचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशासक पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. आशा कार्यकर्तींना कोरोना योध्दा म्हणून सन्मानपत्र देवून त्यांचा सन्मानीत करण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रात काम करणार्‍या पत्रकार निळकंठ कांबळे व अन्य पत्रकारांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपादक पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले.

 यावेळी मीनाक्षी निळकंठ राठोड, हरिदास भोसले, माजी सरपंच गणेश पाटील, प्रकाश सुभेदार, लक्ष्मण कांबळे, महादेव लोहार, बुद्धिवंत कांबळे, दुशासन सुरवसे, राजेंद्र सुरवसे ,पत्रकार दिनेश पाटील माडज,सुनिल माने ,भैय्यासाहेब सुरवसे ,केरनाथ  कांबळे,विजयानंद सुरवसे,सर्व नाईचाकुर प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आशा कार्यकर्ती अदिजन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उमेश सुरवसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशिका फौंडेशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात लातूर येथील वैभवी घारगावकर हिचा मी रमाई बोलते हा एकपात्री प्रयोग सादर करण्यात आला. या प्रयोगाला उपस्थितांनी दाद दिली.


 
Top