तुळजापूर / प्रतिनिधी- 

तालुक्यातील वडगाव लाख येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. २५ हजार रुपयांची रोख रकमेची बक्षिसे असलेल्या स्पर्धेचे उद्घाटन युवासेना तालुका प्रमुख प्रतिक रोचकरी आणि सरपंच राजेश करंडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम पारितोषिक १५ हजार ५५५ रुपये तर ११ हजार १११ द्वितीय पारितोषिक ठेवण्यात आले आहे. याशिवाय सलग तीन चौकार, सलग तीन षटकार, मॅन ऑफ दि मॅच, मॅन ऑफ दि सिरीज आदी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यावेळी राजेंद्र मेटे, महेश मेटे, लखन गायकवाड, दत्ता करंडे, दामोदर गाडवे, राजेंद्र गाढवे, धनाजी चंदनशिवे आदींची उपस्थिती होती.

 
Top