शिराढोण / प्रतिनिधी

दि. 18 फेब्रुवारीच्या मध्यरात्री व 19 फेब्रुवारी दुपारपर्यंत शिराढोण व परिसरात वादळी वारे व मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने झोडपून काढले. यामध्ये रब्बी हंगामातील काढणीस आलेले हरभरे, गहू पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये परिसरातील मोसंबी,आंबा, डाळिंब, पपईसह पेरू बागांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

फळ बागायतदार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून तोंडाला आलेला घास निसर्गाच्या कोपामुळे पुन्हा हिरावून गेला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाले आहेत. यामध्ये शिराढोण येथील शेतकरी राजेंद्र मुदडा  यांच्या केशर आंबा व मोसंबीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. बापू माकोडे यांच्या पपईचा प्लॉटच उध्वस्त झाला तसेच उद्धव खडबडे यांचा डाळिंब बहार जमीनदोस्त झाला आहे. राजेंद्र मुदडा यांच्या केशर आंब्याच्या बागात वादळी वाऱ्यामुळे कैऱ्यांचा जमीनीवर सडासच पडला आहे.  झाडावरील 80 टक्के आंबा जमीनदोस्त झाला तर मोसंबीच्या बागेत धरलेला आंबेबहार लहान वयातच जमिनदोस्त झाल्याने फार मोठे आर्थिक नुकसान झाले.

 
Top