उमरगा  / प्रतिनिधी

 उमरगा येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले .

 सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने महामार्गावरील दूध डेअरी समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती. कोवीड-१९ च्या प्रादुर्भावामुळे तसेच संसर्ग वाढूनये यासाठी जयंती महोत्सवावर शासनाच्या वतीने विविध निर्बंध घालण्यात आले आहेत . त्यामुळे शिवजयंती महोत्सव मंडळाच्या वतीने मिरवणुका टाळून अनेक ठिकाणी प्रतिमा व मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. कोरोना चे सर्व नियम पाळत सदरील जयंती महोत्सवात शिवजयंती उत्साहाने साजरी करण्यात आली .

 यावेळी भारत शिक्षण संस्थेचे संचालक आप्लेश मोरे, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती चे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक संजय पवार, रामकृष्ण बिराजदार, डॉ .संजय अस्वले,नगरसेवक बालाजी पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष खाजा मुजावर, अध्यक्ष संजय जाधव,विशाल कानेकर, सिद्धेश्वर कलशेट्टी, विशाल माने, राम माळी, विशाल ओवांडकर, मिथुन पाटील, दादा करवते, दादा कांबळे, खंडू राठोड, शिवाजी पाटील यांच्यासह शहर व परिसरातील शिवभक्त युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 
Top