उस्मानाबाद / प्रतिनिधी -

 कोरोना काळातही सर्व नियम पाळून शिवजन्मोत्सव सोहळ्याची धूम सर्वत्र सुरु असताना उस्मानाबाद शहरातील वैष्णवी सोनसाळे या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारुन छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखे अभिवादन केले आहे.

शहरातील काळा मारुती चौक, मारवाडी गल्ली येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या पूर्वसंध्येस गुरुवारी ही प्रतिकृती तयार करण्यात आली असून ती 21 फेब्रुवारीपर्यंत शिवभक्तांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत ही प्रतिकृती सर्वांसाठी खुली असून शिवप्रेमींनी ही वैशिषट्यपूर्ण कलाकृती पाहण्यासाठी आवर्जुन भेट द्यावी, असेही सोनसाळे कुटुंबियांनी कळविले आहे. वैष्णवी ही उस्मानाबाद शहरातील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. या कलाकृतीची गुरुवारी दिवसभरात अनेक शिवप्रेमींनी पाहणी करुन कौतुक केले.

 
Top