उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 मध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने यंदा रविवार 21 फेब्रुवारी ते बुधवार 24 फेब्रुवारी दरम्यान भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान महिला बचत गट तसेच अन्य विक्रेत्यांच्या माध्यमातून वस्तू विक्री प्रदर्शनासह खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक बचत गट व विक्रेत्यांनी तात्काळ नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

रविवारी सायंकाळी चला हवा येऊ द्या फेम कलाकारांच्या उपस्थितीमध्ये सांगीतिक मेजवणीसह हसवणुकीच्या कार्यक्रमाने प्रारंभ होणार आहे. त्यानंतर सोमवार ते बुधवार सलग तीन दिवस आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य अशी ख्याती असलेल्या शंभूराजे या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत. सलग चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या ठिकाणी वस्तू विक्री प्रदर्शन तसेच खाद्यमहोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे.

विक्रेत्यांना दहा बाय दहा आकाराचा स्टॉल आयोजन समितीच्या वतीने सशुल्क उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच विजेची व्यवस्था, टेबल, खुर्च्या आदींची व्यवस्थाही पुरवली जाणार आहे.  मोजकेच स्टॉल शिल्लक असल्याने विक्रेते तसेच महिला बचत गटांनी तात्काळ नोंदणी करण्याचे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे उपाध्यक्ष ऋषिकेश चपने ( 9273100000 )यांनी केले आहे. नोंदणीसाठी उशिरा येणाऱ्या विक्रेते अथवा महिला बचत गटांचा विचार केला जाणार नाही.

 
Top