उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 जिल्ह्यातील सामाजिक, संस्कृतिक, ऐतिहासिक, विकासात्मक आणि  प्रशासकीय  या विषयांशी सम्बधित 1980 पूर्वीच्या छायाचित्रांची स्पर्धा घेण्यात येणार असून निवडलेली छायाचित्र जिल्हा नियोजन समितीच्या नव्या वास्तूत, जिल्हाधिकारी कार्यालयात आणि मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत ऐतिहासिक ठेवा म्हणून जपून ठेवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी आणि जिल्ह्याच्या ऐतिहासिक स्मृतींना जतन करण्यासाठी आपल्याकडील छायाचित्र पाठवावीत असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज केले आहे .                                   

या स्पर्धेसाठी पाठवलेल्या  छायाचित्रातून तज्ज्ञमार्फत निवड करून आकर्षक बक्षीसं दिली जाणार आहेत. पुरस्कार, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. ही छायाचित्र 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला,औरंगाबाद रोड, उस्मानाबाद या पत्यावर पाठवावे.किंवा प्रत्यक्ष आणून द्यावेत.असेही आवाहन श्री . दिवेगावकर यांनी केले असून स्पर्धेनंतर निवडक प्रदर्शनही भरवण्याचा मानस आहे .  


 
Top