तुळजापूर / प्रतिनिधी

श्रीतुळजाभवानी मंदीरसकडे जाणाऱ्या भवानी रोडवर  रस्त्यावर अंत्यत वर्दळीचा असणाऱ्या  दिपक चौकात काही भाजी विक्रेत्यांनी आपले बस्ताण मांडल्याने या चौकात पादचारी व वाहनांची कोंडी होत असल्याने हा रस्ता अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी नितीन रोचकरी यांनी मुख्याधिकारींना निवेदन देवुन केली आहे.

 या निवेदनात असे नमूद केले आहे की,दीपक चौकात भाजी विक्रेत्यांनी रोडवर आपले बस्तान मांडले आहे त्यामुळे शहरात येणारे भाविक व स्थानिक रहिवासी व वाहनांना वाहनतळात जाताना अडथळा निर्माण होत आहे मागील काही दिवसा खाली एक दोन वेळेस या भाजी विक्रीत्यामुळे टू व्हीलर चे अपघात देखील झाले आहेत त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने रोडवर अतिक्रमण करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी व रस्ता मोकळा करण्यात यावा या निवेदनावर नितीन रोचकरी यांचे स्वाक्षऱ्या आहे.

 
Top