तुळजापूर / प्रतिनिधी-

नगरपरिषद तील दोन नियुक्त स्विकृत सदस्य निवडीसाठी सोमवार दि१५रोजी  बोलविण्यात आलेली विशेष सर्वसाधारण सभा गणपुर्ती  अभावी पुढे ढकलण्यात आल्याने दोन स्विकृत नगरसेवकांचा निवडी आज होवु शकल्या नाहीत 

तुळजापूर नगरपरिषद मधील दोन स्विकृत नगरसेवकांनी १५जानेवारी रोजी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानै या रिक्त दोन जागी स्विकृतसदस्य निवडीसाठी सोमवारी विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती यासाठी पिठासन अधिकारी म्हणून उपविभागीयअधिकारी योगश खैरमाटे  यांना नियुक्त केले होते माञ अपेक्षित  नगरसेवक न आल्याने गणपुर्ती अभावी ही विशेष सभा पुढे ढकलण्यात आली आहे.

स्विकृत सदस्य पदासाठी श्रीनाथ शिंदे व रत्नदिप भोसले यांचे नावे सत्ताधारी कडुन चर्चित होते.

 
Top