उमरगा / प्रतिनिधी

 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज माधवराव पाटील तसेच मुरूम बाजार समितीचे सभापती बापूराव पाटील यांच्या मातोश्री श्रीमती गंगादेवी माधवराव पाटील (८९) यांचे गुरुवारी (दि.४) दुपारी अल्पशा आजाराने सोलापूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे, असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी एक वाजता मुरूम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 
Top