तुळजापूर / प्रतिनिधी -
महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास कार्यालयाकडे तिर्थक्षेञ तुळजापूर येथे बसविण्यात येणारा छञपती शिवाजी महाराज पुतळा व सुशोभाकरण सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल असुन यास मान्यता मिळताच तातडीने काम सुरु करणार असल्याची माहिती, नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी पञकार परिषद घेऊन दिली.
आगामी शिवजयंती पार्श्वभूमीवर तिर्थक्षेञ तुळजापूर येथील पुतळा विषय पुन्हा चर्चत येत असल्याने या बाबतीत नगरपरिषद ने १६/१२/२०२० पासुन पुतळा सुशोकरण करण्यासाठी आज पर्यत नगरपरिषदने काय काम केले याची सविस्तर माहीती दिली. या प्रसंगी नगरसेवक माऊली भोसले , विजय कंदले, विनोद पिटु गंगणे, विशाल रोचकरी, नगरपरिषद अभियंता प्रशांत चव्हाण आदींची उपस्थिती होती.