तुळजापूर / प्रतिनिधी

मराठा समाजाच्या आरक्षणसाठी साष्ठ पिंपळगावला चालु असलेल्या साखळी  आंदोलनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात गावोगाव आंदोलन केले तर सरकारवर दबाब येईल व मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागेल, असे प्रतिपादन नरेंद्र पाटील यांनी  मराठा समाज बांधवांच्या बैठकीत केले.

 या बैठकीत बोलताना  नरेंद्र पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळवुन देण्याबाबतीत या सरकारची भूमिका संशयास्पद वाटते.शेतकरी आंदोलनाची दखल जशी सर्वांनी घेतली तशी दखल लाखोंचे मोर्च काढुन ही मराठा समाजाच्या आंदोलनाची घेतली गेली नाही, अशी खंत व्यक्त केली. मराठा आरक्षण हा प्रश्न गंभीर असताना राजकिय पक्ष व मराठा समाजाचे नेते दखल घेत नसल्याची खंत व्यक्त केली . ही मराठा समाजाची अंतिम लढाई आहे, मराठा समाज आरक्षणावर तरी मराठा समाजातील नेत्यांनी राजकारण करु नये,असे मला वाटते.मराठा आरक्षण हा स्वातंत्र्य विषय आहे सध्या काही मंडळी ओबीसी व मराठ्यात आरक्षणा प्रश्नी वाद लावत असल्याचे यावेळी ते म्हणाले. आज स्थितीत  मराठा बांधवांच्या पाठीशी उभे राहणे ही आज काळाची गरज आह.

 यावेळी   सज्जनराव साळुंके, प्रशांत आपराद , अर्जुन साळुंके, आबासाहेब कापसे, अजय साळुंखे, प्रशांत सोंजी , महेश गवळी, अण्णासाहेब शिरसागर, कुमार टोले, मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top