उस्मानाबाद / प्रतिनिधी

जिल्हयातील बालविवाह थांबविण्यासाठी जिल्हयात सक्षमपणे कामे सुरू आहेत.परंतू हे काम अधिक चोखपणे करण्यासाठी आणि बालविवाहचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हयातील विविध शासकीय विभागानी करावायाच्या कामांचा कृती आराखडा तयार करण्यात यावा.असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे दिले.

 बालविवाह निर्मलनासाठीच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक आज या टास्क्‍ फोर्सचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली,तेव्हा ते बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी.एच. निपाणीकर,सेंटर फॉर सोशल ॲन्ड बेहेव्हीअर चेंज कम्युनिकेशन(SBC3)  राज्य प्रमुख निशाद कुमार आणि जिल्हा टास्क फोर्सचे समितीचे सदस्य, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 एसबीसी-3 संस्थेचा नॉलेज पाटनर म्हणून सहभाग घेता येईल.युनिसेफ आणि जिल्हा टास्क फोर्सने एकत्र कामे करावीत म्हणजे बालविवाह रोखण्यात नक्कीच यश मिळेल. या कामांशी संबंधित विविध यंत्रणातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करून त्यांचा कामातील सहभाग वाढविण्याचे प्रयत्न करण्यात यावेत.शिक्षक हा यातील महत्वाचा घटक आहे.त्यांनाही या कामात सहभागी करण्यात यावे,शाळामधून शिक्षकांनी मुल्य शिक्षण आणि इतर विषयाच्या अनुषंगाने मुला-मुलीमध्ये जागृती करण्याचे काम करावे, असे सांगून श्री. दिवेगावकर म्हणाले की,बालविवाह रोखण्यासाठी जाणीव जागृतीसाठी आवश्यक असणारी साधन सामुग्री तयार करण्यात यावी.प्रशासकीय यंत्रणानी याबाबत या करावयांची एक एसओची तयार करावी. प्रयत्न करूनही बालविवाह होऊन अल्पवयीन मुलगी गरोदर राहीली तर त्याबाबत अंगणवाडी सेविका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी व्याधीग्रस्थ गरोदर मातेची जशी काळजी घेतली जाते तशी या मुलींची काळजी घ्यावी. विवाह कधी झाले आणि इतर तत्सम माहिती घेऊन त्या मुलीबाबतची माहिती नोंदवून तिला मदत करावी. जेणे करून तिला होणारे मुल सक्षम होईल आणि त्या मुलींचे आरोग्यही धोक्यात येणार नाही असेही आदेश यावेळी  त्यानी आदेश दिले.

 एसबीसी-3 चे  निशादकुमार यांनी बालविवाह निर्मुलनासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग,युनिसेफ आणि एसबीसी-3 यांच्या संयुक्त विद्यमाने  राबविण्यात येणाऱ्या सक्षम नावाच्या उपक्रमाची संगणकीय सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली. या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्हयातील बालविवाह थांबविण्यासठी सुक्ष्म स्वरूपाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी टास्क्‍ फोर्सचे सदस्य यांनी सूचना करण्यात त्यांचा नक्कीच उपयोग केला जाईल असेही श्री. दिवेगावकर यांनी यावेळी सांगितले. त्याप्रमाणे या कृती आराखडयासाठी सर्वांकडून माहिती घेण्यात आली.


 
Top