उस्मानाबाद/ प्रतिनिधी

  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापन  करण्यात आलेल्या गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक शिस्त येत आहे . ही बाब लक्षात घेऊन १५ महिला स्वयंसहायता बचत गटांना उमेद अंतर्गत 3४ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले .

  बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे जीवनमान उंचावत आहे असे प्रतिपादन उस्मानाबाद शहरातील  स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे व्यवस्थापक संदीप जगताप यांनी केली . महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद उस्मानाबाद मार्फत स्थापित देवळाली, शिंगोली, सारोळा, वडगाव, रुईभर या गावातील महिला स्वयंसहायता गटांना स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा उस्मानाबाद च्या मार्फत कर्ज वाटप करताना ,  ते बोलत होते .  यावेळी एकूण १५  महिला स्वयंसहायता गटांना ३४ लाखांचे बँक कर्ज वाटप करण्यात आले . या कर्जाच्या माध्यमातून महिला विविध प्रकारचे व्यवसाय करणार असून त्यासाठी त्यांना लागणारी सगळी तांत्रिक मदत उमेद अभियानाच्या माध्यमातून दिले जाणार असल्याचे तालुका समन्वयक राहुल मोरे यांनी सांगितले. आत्तापर्यंत देण्यात आलेल्या कर्जांची परतफेड गटांनी वेळेवर केली असल्याचे आणि पहिला दुसरा तिसरा चौथा टप्पा पर्यंत गटांना बँक वित्त पुरवठा करत असल्याचे तालुका अभियान व्यवस्थापक अभिजीत पडवळ यांनी याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका व्यवस्थापक रेशमा मोरे यांनी केले या कार्यक्रमासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक समाधान व्यवस्थापक  जिल्हा व्यवस्थापक अल्ताफ जिकरे, अमोल सिरसट उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफिसर  महेश भूमकर प्रभाग समन्वयक संतोष गवळी विशाल भोसले दिपाली शिंदे यांनी प्रयत्न केले.

 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजयकुमार फड , प्रकल्प संचालक अनिल कुमार नवाळे आणि  उस्मानाबादच्या गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद तालुक्यास देण्यात आलेले वार्षिक उद्दिष्ट बँकांच्या सहकार्याने वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याचे तालुका अभियान व्यवस्थापक अभिजीत पडवळ यांनी सांगितले.

 
Top