उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हयातील गुणवंत खेळाडू पुरस्कार, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार आणि गुणवंत क्रीडा कार्यकर्ता यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे मूल्यमापन करून त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जिल्हयातील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा कार्यकर्ता यांच्या  करिता शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार दिला जातो.त्याची घोषणा यापूर्वी करण्यात आली होती.  

 या पुरस्कारांचे  आज प्रजासत्ताक दिनांच्या समारंभात  मंत्री, मृद व जलसंधारण, तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.

 जिल्हा क्रीडा 2017-18 चे मानकरी अमितकुमार राचलिंग भागुडे, गुणवंत खेळाडू (पुरुष) (आट्या पाट्या),ऋतुजा विठ्ठल खरे गुणवंत खेळाडू (महिला) (खो-खो), राजाभाऊ विष्णु शिंदे(पुरुष)गुणवंत क्रीडा मार्गदर्शक  (आटया-पाटया), मन्मथ भगवानराव पाळणे गुणवंत क्रीडा संघटक/कार्यकर्ता. जिल्हा क्रीडा 2018-19 चे मानकरी

 श्रीधर राजकुमार सोमवंशी गुणवंत खेळाडू (पुरुष) (तलवारबाजी),शितल बापुराव ओव्हाळ गुणवंत खेळाडू (महिला) (आटया-पाटया),संजय मनोहर देशमुख गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (व्हॉलीबॉल),राजेश रेशमा बिलकुले गुणवंत क्रीडा संघटक/कार्यकर्ता या सर्वांना आज पालकमंत्र्यांच्या हस्ते स्मृती चिन्ह, प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.


 
Top