उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हयामध्ये शालांत परिक्षोत्तर (मॅट्रिकोत्तर) शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये रक्कम थेट जमा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.त्यानुसार http://mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर शालांत परीक्षोत्तर (मॅट्रिकोत्तर) शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती घेण्यासाठी अर्ज करता येणार आहेत.दिव्यांग विद्यार्थ्यानी डीबीटी पोर्टलव्दारे अर्ज भरून संबंधित महाविद्यालयाकडे पाठवावेत,असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले यांनी केले आहे.

 संबंधित महाविद्यालयाने प्राप्त अर्जाची पडताळणी करून प्राप्त झालेले अर्ज जि.प.च्या समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावेत.प्राप्त झालेल्या अर्जदारास इयत्ता दहावी  नंतरचे महाविद्यालयीन,व्यावसायिक,तांत्रिक व अभियांत्रीकी शिक्षणासाठी त्यांच्या अभ्याक्रमांच्या दर्जाप्रमाणे अभ्यास क्रमांचे गट करून दरमहा शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये देण्यात येते.

 त्याचबरोबर अंध विद्यार्थ्यांना वाचक भत्ता,दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीबरोबर शैक्षणिक शुल्क,प्रकल्प टंकलेखन खर्च,अभ्यास दौरा खर्चाची रक्कम दिली जाते.(अकरावी, बारावी, प्रथम वर्ष-230 रूपये दरमहा,व्दीतीय व तृतिय वर्ष 300 रुपये दरमहा एम.ए.व इतर व्यावसायीक अभ्यास क्रमासाठी-530 रुपये दरमहा दिले जातात.

  या योजनेचा लाभ घेणेसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेमार्फत/कॉलेजमार्फत अर्ज महाडीबीटी पोर्टल व्दारे या कार्यालयाकडे जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडील दिव्यांगात्वाचे 40टक्के पेक्षा जास्त असलेले प्रमाणपत्र,मागील वर्षाचे गुणपत्रक,बँकेचे पासबुक इत्यादि कागदपत्रासह ऑनलाईन सादर करावे असेही आवाहन श्री. चौगुले  यांनी केले आहे.


 
Top