उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण कुक्कुट उत्पादकता कार्यक्रमाव्दारे मांसल पक्षी वाटप करुन कुक्कुट व्यवसायास प्रोत्साहन देण्याअंतर्गत उस्मानाबाद जिल्हयातील कमी मानव निर्देशांक असलेल्या भूम आणि वाशी या दोन तालुक्यामध्ये ही योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे.

 भूम तालुक्यातील सुकटा, भवानवाडी, डुक्करवाडी, पाडोळी, घाटनांदुर, रामकुंड, चांदवड, दिंडोरी, हिवरा, हांडोग्री, वाकवड, सोनगिरी, अरसोली, वंजारवाडी, देवळाली, म्हात्रेवाडी, सावरगाव. डा, भोनगिरी,तर वाशी तालुक्यातील- पारा, फक्राबाद, डोगरवाडी, सारोळा मा, मांडवा, पिंपळगाव लि, दसमेगाव, दळवेवाडी, बावी, सेलु, घोडकी, पिंपळवाडी, सारोळा वा. सोनारवाडी, पिंपळगाव को, सोनेगांव या गावात ही योजना राबवावयाची आहे.

 या योजनेमध्ये 600 मांसल पक्षी (Broiler Birds) प्रती लाभार्थी 150 पक्षी एका वेळी असे तीन महिन्याच्या अंतराने चार टप्यात 200 लाभार्थ्याना पिल्लाचा व सहा आठवडे वयापर्यत खाद्य पुरवठा करणे या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या पक्षी वाटप करण्यासाठी जिल्हयातील कुक्कुटपालनाशी संबंधित असलेल्या अनुभवी व्यक्ती, कुक्कुट पालन विश्वस्त संस्था, कुक्कुट पालन बचत गट, कुक्कुट पालन सहकारी संस्था, कुक्कुट पालन अशासकीय संस्था यांच्यापैकी एकाची स्थानिक मध्यस्थ म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे.

 कुक्कुट पक्षी व कुक्कुट खादय वाटप करु इच्छिणाऱ्या जिल्हयातील मध्यस्थानी दि.29 जानेवारी-2021 पर्यत कार्यालयीन वळेत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, कार्यालय उस्मानाबाद (आनंद नगर जनावराचा दवाखाना आवार) येथे अर्ज करावेत. कार्यालयाची तांत्रिक शाखा-1 ची पोहच घ्यावी. इतरत्र दिलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.


 
Top