तुळजापूर / प्रतिनिधी - 

हिंदुराष्ट्र सेनेने  उस्मानाबादचे धाराशिव  व औरंगाबाद चे छञपतीसंभाजीनगर असे  नामांतर करण्याची पुन्हा   एकदा तहसिलदार यांना बुधवार दि.२७रोजी निवेदन मागणी केली.  हिंदुराष्ट्र सेना तुळजापूर तालुक्याच्या वतीने शहरातून पायी फेरी काढून तहसीलदार मार्फत मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दोन्ही जिल्ह्यांच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. 

सद्याचे शासकीय नाव हे उस्मानाबाद आहे हे नाव पारतंत्र्याची निशाणी असून हा भारतीयांवर गुलामीचा डाग आहे. त्यामुळे धाराशिव  नाव करून सरकारने स्वतंत्र भारतात आपण आहोत याची प्रचीती द्यावी तसेच औरंगाबाद  चे नाव काढून टाकून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी नगर करावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी महंत मावजीनाथ महाराज, महंत व्यकंटअरण्य महाराज, संजय सोनवणे,परीक्षित साळुंके, सुदर्शन वाघमारे, गिरीश लोहारेकर, अर्जुन साळुंके, सुधीर परमेश्वर, दिनेश पलंगे,जिओत्तम जेवळीकर, शिवराज जाधव,दिनेश धनके व शेकडो हिंदुत्ववादी उपस्थित होते.


 
Top