उस्मानाबाद/ प्रतिनिधी

तालुक्यातील झरेगाव येथे याराना क्रिकेट क्लबच्यावतीने ZPL-2021 हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे दि. ५ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी प्रथम ७ हजार ७७७ रुपये, द्वितीय ५ हजार ५५५ रुपये व तृतीय ३ हजार ३३३ रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत. तसेच मॅन ऑफ द सिरीजसाठी ५०१ रुपये, सलग चार चौकारसाठी ५०१ रुपये, सलग चार षटकारसाठी ५०१ रुपये, सलग तीन विकेटसाठी ५०१ रुपये, मिडन ओव्हरसाठी ५०१ रुपये, उत्कृष्ट झेलसाठी ५०१ रुपये व जलद अर्धशतकसाठी ५०१ रुपये अशी आकर्षक व प्रोत्साहनपर बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. या स्पर्धेचा सामना ८ षटकांचा असून सामने बाद पध्दतीने खेळविले जाणार आहेत. तसेच एक खेळाडू एकाच संघात खेळू शकणार असून संघाने दिलेल्या वेळेत पोहोचणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.  जर संघ वेळेत न पोहोचल्यास तो संघ बाद करण्यात येईल व पंचांचा निर्णय अंतिम राहील#

 या क्रिकेट स्पर्धेत जास्तीत जास्त क्रिकेट संघानी सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजक विजय तांबे - ९७६७७०७११४, विकास सोनवणे - ९११२८७५२८६, अनिकेत ढोकळे - ९८३४६७९८७२, धनाजी सोनवणे - ९३२५७३७००६, सागर एडके - ९५१८५१५७२२, महादेव सोनटक्के - ८९९९०३२९८०, तानाजी ढोकळे, ऋषिकेश सोनटक्के, ज्ञानेश्वर ढोकळे, वैभव धर्में, प्रकाश सोनवणे, रंजीत एडके, दिनेश धर्मे, राहुल एडके,  बिपीन धर्में, संजय संकपाळ, ओम ढोकळे, प्रदीप एडके, उमेश सोनटक्के, सुधीर सोनवणे, पवन ढोकळे व विशाल संकपाळ यांनी केले आहे.

 
Top