उमरगा / प्रतिनीधी

येथील जिल्हा परिषद हायस्कूल मधील बोरवेल नादुरुस्त झाली होती रीबोर करून नवीन मोटार बसविण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीकडून पंचवीस हजार लोकवाटा जमा करून विद्यार्थी व शाळेचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात काढला आहे. शाळेसाठी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था झाली आहे .त्यामुळे विद्यार्थी व पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

 जून महिन्यापासून कोरणा मुळे विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद असली तरी जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या प्रयत्नातून शाळेला नवीन गेट बसविणे .मियावाकी पद्धतीने 4000 वृक्षाचे वृक्षारोपण व संवर्धन करणे .शाळेला रंगरंगोटी करणे .शालेय परिसर स्वच्छ करणे. इत्यादी कामे अविरतपणे चालू आहेत.अचानक बोअरवेल बंद पडल्यामुळे शाळेचा  पाणीप्रश्न गंभीर झाला होता.परंतु मुख्याध्यापकांनी  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा व सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती केल्यावर सर्वांनी प्रयत्न करुन पाणी प्रश्न सोडविल्या मुळे जूनमध्ये शाळेत मियावाकी पद्धतीने लागवड करण्यात आलेल्या चार हजार रोपांचे संगोपन चांगल्या प्रकारे होणार आहे. शाळा व्यवस्थापन समितीकडून शाळेला आर्थिक मदत केल्याने मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा  शकुंतला मोरे उपाध्यक्ष शंकर सुरवसे अशोक पतगे श्याम भोसले. किसन खंडागळे. सोनाली काळे .अफरोज बानकर. या सर्व मान्यवरांचे स्वागत करून आभार मानले .यावेळी शाळेतील शिक्षक बाबासाहेब जाधव. बशीर शेख. चंद्रशेखर पाटील .धनराज तेलंग संजय रुपाजी. बलभीम चव्हाण. फैजोदिन पटेल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता उपासे प्रास्ताविक मुख्याध्यापक पद्माकर मोरे तर आभार बलभीम चव्हाण यांनी मानले. यावेळी विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

 
Top