उस्मानाबाद / प्रतिनिधी:

  राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथे दि.६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास राज्यासह ेशाच्या विविध कानाकोपर्‍यातून शेतकरी व पदाधिकारी येणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटूरे यांनी केले आहे.

राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे पहिले अधिवेशन केशेगाव येथे होत असून या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर खल करण्यात येणार असून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ठोस भूमिका घेण्यात येणार आहे. बरोबरच समाजाच्या तळागळातील मजूर, मागासवर्गीय घटक, कामगार व विद्यार्थी तसेच सुशिक्षित बेकारांची करण्यात येत असलेली फसवणूक व फरपट सत्ताधारी ज्या पद्धतीने धोरणे राबवून त्यांना वेठीस धरत आहेत. यासह समाज घटकाच्या सर्व प्रश्नाबाबत या अधिवेशनात रणनीती ठरवून धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत.

 या अधिवेशनासाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिल मेश्राम, प्रदेशाध्यक्ष अर्जुनराव गालफाडे,‌ राष्ट्रीय सरचिटणीस सुभाषचंद्र झा, राष्ट्रीय महासचिव आनंद नायर, प्रदेश सरचिटणीस मारुती गायकवाड, प्रदेश प्रवक्ता श्यामराव भगत, प्रदेश उपाध्यक्ष चंद्रशेखर भोंडवे, राष्ट्रीय सरचिटणीस अतिष राठोड, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेश तोरमल, ठाणे जिल्हाध्यक्ष रक्षा मिश्रा, कल्याण शहर अध्यक्ष राजेंद्र पवार, विदर्भ विभागीय अध्यक्ष स्वप्निल पातोडे, प्रदेश उपाध्यक्ष हेमंत दारा, ॲड.रमेश बारई, अशोक चव्हाण, केशव मेश्राम, रामभाऊ इंगळे, संजय जाधव, रवींद्र गायकवाड, सुरज इंगोले, चेतन राठोड, रुद्रप्रताप दस्तगीर, सुनील यादव, विलास सौदागर, सोमनाथ गालफाडे, सुवर्णा साबळे, मंदाकिनी गायकवाड, अनिल थुल, शालिग्राम बनसोड, सुनील यादव, अमित इंगळे, कैलास सरकटे, रमेश कांबळे, मराठवाडा अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे व बापूसाहेब शिंदे आदीसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन अध्यक्ष निटुरे यांनी केले आहे.

 
Top