उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या महाविकास आघाडीच्या  नवनिर्वाचित सभापतींच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री सुरेश दाजी बिराजदार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते जीवनराव गोरे  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस बांधकाम सभापती-प्रदीप घोणे, पाणी पुरवठा-बाबा मुजावर, स्थाई समिती-खलिफा कुरेशी, शिवसेना महिला व बालकल्याण सभावती-सौ सोनाली रवी वाघमारे, शिक्षण व सुसंकृतिक सभापती- सिद्धेश्वर कोळी, आरोग्य व स्वछता सभापती-श्री राणा बनसोडे, काँग्रेस महिला व बालकल्याण उप सभापती-सौ विद्या देवानंद एडके, स्थाई समिती-श्री सिद्धर्थ बनसोडे यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे नगरपालिकेचे गट नेते गणेश खोचरे शहराध्यक्ष आयाज शेख, कार्याध्यक्ष सचिन तावडे, नगर सेवक प्रदीप मुंडे,सनी पवार, अशोक पेठे,इस्माईल शेख, मा. नगरसेवक मैनुद्दीन पठाण, कादरखान,वाजीद पठाण, मृत्युंजय बनसोडे,प्रवीण तांबे, अमोल सुरवसे, गौस तांबोळी , विशाल शिंगाडे, संग्राम बनसोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

 
Top