उमरगा / प्रतिनिधी

 तालुक्यातील एकोंडी जहागीर येथील रहिवाशी आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते पांडुरंग साधू सोनकांबळे वय ८६  यांचे रविवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास निधन झाले.  सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एकोंडी येथील त्याच्या शेतात अत्यं संस्कार करण्यात आले. 

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,चार विवाहित मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे.उमरगा येथील कोर्टातील लिपिक दत्ता सोनकांबळे यांचे ते वडील होत.त्याच्या अंत्यविधीला पंचक्रोशीतील नागरिक, राजकिय व्यक्ती कर्मचारी उपस्थित होते.

 
Top