कळंब/( शिवप्रसाद बियाणी

कळंब सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणूकीची धामधूम सुरू असुन राज्य निवडणूक आयोगाने दि 17 /12 /2020 रोजी काढलेल्या आदेशानुसार नागरी स्वराज्य संस्थांसाठी आचारसंहिता लागू नसली तरी ग्रामपंचायतीच्या मतदारांवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडू नये असे आदेश असतानाही कळंब नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांनी 1 जानेवारी रोजी नगर परिषद सर्वसाधारण सभा 18 जानेवारी रोजी बोलावली असुन ही सभा 18 जानेवारी रोजी ठेवली असुन या सभेची त्यांनी 1ते 25 क्रमांकाची विषयपत्रिका जोडली असुन या विषय पत्रिकेवर विषय क्रमांक 14,15, 16 मध्ये थोर महापुरुष अनुक्रमे जुन्या बसस्थानकातील शॉपिंग सेंटरला छत्रपती संभाजी महाराज, आठवडी बाजारातील शॉपिंग सेंटरला भगवान गौतम बुध्द शॉपिंग सेंटर, व भाजी मंडई रोडवरील शॉपिंग सेंटरला महंमद पैगंबर शॉपिंग सेंटर नावे देण्याबाबतचे विषय ठेवण्यात आले आहेत. सुवर्णा मुंडे ह्या अध्यक्षपदी विराजमान होऊन चार वर्षे होऊन गेली आहेत आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडून आलेल्या आहेत.

सध्या तालुक्यात 59 ग्रामपंचायतीच्या निवडणूका सुरू आहेत. या निवडणूकीवर प्रभाव टाकण्यासाठीच त्यांनी हा विषय कोणाचीही मागणी नसताना घेतला असून त्यांनी हे शॉपिंग सेंटर पाच वर्षे बांधून झालेली असताना आतापर्यंत निर्णय घेतला नाही असे नमूद केले आहे. तरी यावर तातडीने उचित कार्यवाही व्हावी अशी विनंती शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक शिवाजी कापसे यांनी जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी कार्यालयांमार्फत दिली आहे व माहितीसतव प्रत तालुका निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिली आहे.

 
Top