तुळजापूर  / प्रतिनिधी-

 बंजारा समाजाबद्दल अश्लील लिखाण करणाऱ्या हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कांदबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या वर त्वरित गुन्हा नोंद करुन त्यांना अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तुळजापूर तालुक्यातील समस्त बंजारा समाजाने पोलिस खात्याला निवेदन देवुन दिला आहे.

निवेदन देतेवेळी जि.प.सदस्य प्रकाश चव्हाण, राजु चव्हाण, लक्ष्मन राठोड, गोविंद राठोड, वसंत चव्हाण, लखन चव्हाण, कुमार राठोड, राहुल राठोड, उत्तम राठोड, नामदेव पवार आदींची उपस्थिती होती.

 
Top