उस्मानाबाद /प्रतिनिधी
शिक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या, अपमानास्पद वागणुकीला झुगारून महिलांना शिक्षण देणाऱ्या क्रांती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांची १९० वी जयंती फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने साजरी करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुहिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी बाबासाहेब बनसोडे,धनंजय वाघमारे,गणेश रानबा वाघमारे,विजय बनसोडे,संजय गजधने,सोमनाथ गायकवाड,प्रविण जगताप,मुकेश मोटे,नाना भेंडे,विनायक गायकवाड तसेच भिमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मेसा जानराव,राजाराम बनसोडे, सचिन सरवदे, सोनवणे अन्य इतर उपस्थित होते.
