खरे तर सावित्रीबाईंचे जीवन सर्वांसाठीच रोल मॉडेल आहे. एक महान शिक्षणतज्ज्ञ, समाजकार्यकर्ता, कवयित्री, पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिक, संप घडवणारी पहिली स्त्री, सत्यशोधक समाजाची कार्यकर्ती अशा विविध भूमिका सावित्रीबाईंनी एकाच आयुष्यात यशस्वी करून आपल्यासाठी खूप मोठे उपकार करून ठेवले आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्ताने उद्याच्या उज्वल भवितव्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे, असा निर्धार करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला शिक्षक दिन राज्यभर साजरा करण्यात आला.
महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुका आणि स्थानिक पातळीवर आयोजित या उपक्रमात शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच तालुका अध्यक्ष सौ सुरेखा नंदकुमार, जाधव शहर अध्यक्ष सौ वंदना डोके व मुख्याध्यापिका डॉ तब्बसुम सय्यद उपस्थित होते.
