उमरगा / प्रतिनिधी

तालुक्यातील मुरूम शहरातील रहिवासी सूत्रय्या रुद्रय्या स्वामी यांची भारत सरकारच्या केंद्रीय जल आणि विद्युत अनुविज्ञान संसाधन शाळेच्या (खडकवासला, पुणे) मुख्य वैज्ञानिकपदी निवड झाली आहे.

सूत्रय्या रुद्रय्या स्वामी हे मुरूम येथील मूळ रहिवासी असून त्यांच्या वैज्ञानिक क्षेत्रातील अनुभवाला न्याय मिळाला असून भारत सरकारच्या केंद्रीय जल आणि विद्युत अनुविज्ञान संसाधन शाळेने यांच्या वैज्ञानिक कार्याची दखल घेत पुणे खडवासला येथील केंद्रीय जल आणि विद्युत अनुविज्ञान संसाधन शाळा मुख्य वैज्ञानिकपदी निवड केली आहे. सूत्रय्या स्वामी यांचे निवडीबद्दल खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी खासदार प्रा रवींद्र गायकवाड, विठ्ठलसाईचे चेअरमन तथा माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, तालुका जंगम समाजाच्या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत स्वामी, सचिव ॲड. प्रशांत स्वामी, शरण स्वामी, सदस्य अशोक स्वामी, प्रवीण स्वामी, पप्पू स्वामी, अमर स्वामी, लिंगराज हिरेमठ, संगमेश्वर स्वामी, संगय्या स्वामी, बसवराज हिरेमठ यांच्यासह तालुक्यातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.


 
Top